संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या बोरीवली या परिसरात आहे. म्हणून ह्या उद्यानाचे नाव पूर्वी म्हणजेच १९७४ साली याचे नामकरण बोरीवली राष्ट्रीय उद्यान असे झाले होते आणि १९८१ मध्ये त्याचे नाव बदलून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे झाले. हे उद्यानाचे क्षेत्रफळ १०४ वर्ग किमी आहे .
मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसराच्या बाजूचाच रहिवासी असल्याकारणाने मला जास्त ह्या उद्यानाचा अभिमान आणि हेवा वाटतो कारण ह्या उद्यानामुळे बोरीवली या परिसराला एक वेगली ओळख मिळाली आहे अगदी दूर दूर हून पर्यटक ह्या उद्यानाला भेट द्यायला येतात .
ह्या उद्यानात प्रवेश शुल्क हि निश्चित आहेत प्रौढांसाठी ४० ते ४५ तर बालकांसाठी २५ ते ३० असे दर आहेत .
आणि परिसरातल्या रहिवाश्यांकरिता प्रभात फेरी साठी वार्षिक पास हि तेथे उपलब्ध आहे .
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी , जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे ,विविध रंग ,आकाराचे २५० प्रकारचे पक्षी आणि ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत .
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते.
उद्यानात राहण्याची सोय असून त्याकरिता विश्रामगृह आणि कुटीर पद्धतीची निवास व्यवस्था आहे.
उद्यानात सिंह विहार आणि व्याघ्र विहार देखील आहे त्यासाठी हि दर आहेत
आणि सर्वात महत्वाची गोष्ट तर उद्यानाच आकर्षण म्हणजे वनराणी ट्रेन जी तुम्हाला संपूर्ण उद्यानाची सैर करून आणते पावसाळ्यात ती ट्रेन बंद असते पण बाकीचे ९ महिने हि ट्रेन सुरूच असते .
तर अश्या ह्या विविधतेने आणि नेसर्गिक देणगीला तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हाला खूप मज्जा येईल
धन्यवाद...